BMW R 18 Classic हिंदुस्थानात लॉन्च, किंमत फक्त…

BMW Motorrad हिंदुस्थानी बाजारात आपली नवीन R 18 Classic cruiser बाईक लॉन्च केली आहे. हिंदुस्थानात ही बनाईक संपूर्ण बिल्ट-अप युनिट म्हणून विकली जाईल. या बाईकमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. आज आपण याच बाईकच्या इंजिन, फीचर्स आणि किंमतबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

इंजिन

BMW R 18 Classic मध्ये 1,802 सीसीचे बॉक्स इंजिन देण्यात आले आहे. जे 91bhp पॉवर आणि 158Nm टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन 6-स्पीड गीयरबॉक्समध्ये जोडण्यात आले आहे. ज्यामध्ये अँटी-होपिंग आणि स्लीपर फंक्शन क्लच देखील आहे. R18 Classic cruiser बाईकची बुकिंग तुम्ही BMW Motorrad शोरुमध्ये जाऊन करू शकता.

R18 Classic cruiser ला मोठ्या विन्डस्क्रीन, पिलियन सीट, सॅडल बॅग, एलईडी हेडलाइट्स आणि 16 इंच फ्रंट व्हील्ससह बाजारात लॉन्च करण्यात आली आहे. हिंदुस्थानात कंपनीने याची किंमत 24 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या