Car History – ‘हे’ उद्योगपती होते हिंदुस्थानातील पहिल्या कारचे मालक, निर्माण केली मोठी ऑटो कंपनी

आज देशात वाहनांच्या गर्दीमुळे अनेक ठिकाणी आपल्याला वाहतुक कोडी झालेली पाहायला मिळते. मात्र एकेकाळी कार असणे ही खूपच प्रतिष्ठेची गोष्ट मानली जाती होती. देशातील प्रतिष्ठित टाटा समूहाची स्थापन करणारे ‘जमशेदजी टाटा’ हे असे पहिले हिंदुस्थानी होते ज्यांनी कार खरेदी केली. त्याच्या आधी हिंदुस्थानात पहिली कार 1897 मध्ये मिस्टर फॉस्टर नावाच्या इंग्रज व्यक्तीने खरेदी केली होती. याच्या पुढच्याच वर्षी म्हणजेच 1898 कार खरेदी करणारे जमशेदजी टाटा हे हिंदुस्थानातील पहिले व्यक्ती बनले. जमशेदजी यांनी टाटा समूहाची स्थापना केली. त्यांना ‘फादर ऑफ इंडियन इंडस्ट्री’ असेही म्हटले जाते.

पुढे जमशेदजी टाटा यांनी ‘टाटा मोटर्स’ची स्थापना केली. आज टाटा मोटर्स जगातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनींपैकी एक आहे. टाटा मोटर्स मोठ्या संख्येने कार, एसयूव्ही, बस, स्पोर्ट कार, कंट्रक्शन इक्यूपमेन्ट आणि सैनिकी वाहने तयार करतात. जेआरडी टाटा यांनी 1945 मध्ये टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनी (टेल्को) ची स्थापना केली. कंपनीला आज आपण ‘टाटा मोटर्स’ या नावाने ओळखतो. 1954 मध्ये जर्मन कार निर्माता कंपनी ‘डेमलर बेंझ एजी’च्या सोबतीने टाटा मोटर्स वाहन निर्माण क्षेत्रात उतरली.

1998 मध्ये कंपनीने पहिली स्वदेशी कार ‘टाटा इंडिका’ बनवली. कंपनीने 1998 च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये ‘टाटा इंडिका’ लॉन्च केली होती. याच्या काही दिवसानंतर इंडियन ऑटो एक्स्पोमध्येही कंपनीने ही कार लॉन्च केली. टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी स्वत: टाटा इंडिका ही हिंदुस्थानातील पहिली स्वदेशी कार ड्राईव्ह करत लाँच केली होती. टाटा ग्रुप आणि रतन टाटा हे नेहमीच प्रयोगशील राहिले आहेत. रतन टाटा यांनी सर्वसामान्यांपर्यंत कार पोहोचवण्याचे स्वप्न साकारत 2008 मध्ये ‘टाटा नॅनो’ लॉन्च केली होती. टाटा मोटर्सने 2008 मध्ये फोर्डकडून ‘Jaguar Land Rover’ ही विकत घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या