नवीन ‘बोलेरो’ची हिंदुस्थानात एंट्री, फक्त 1 हजार युनिट्सची होणार विक्री

2968

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आपली नवीन ‘बोलेरो’ हिंदुस्थानात लॉन्च केली आहे. कंपनीने बोलेरोचा हा स्पेशल एडिशन लॉन्च केला असून हा मॉडल सर्व व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. नियमित मॉडेलपेक्षा कंपनीचा हा स्पेशल मॉडल सुमारे 22,000 रुपये महाग आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या महिंद्रा बोलेरो पॉवर प्लसची किंमत 7.85 लाख रुपयांपासून सुरू होऊन 8.86 रुपया पर्यंत आहे. नवीन बोलेरो पॉवर प्लसच्या स्पेशल ऍडिशनची केवळ 1000 युनिटची विक्री केली जाणारा आहे.

नवीन महिंद्रा बोलेरो पॉवर प्लसमध्ये अनेक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीने या एसयूव्हीमध्ये स्पेशल एडिशन डेकल्स, स्पेशल एडिशन सीट कव्हर्स, स्पेशल एडिशन कार्पेट मॅट्स, स्टीयरिंग व्हील कव्हर, फ्रंट बम्पर अ‍ॅड-ऑन फॉग लॅम्प, स्पॉयलर्ससह स्टॉप लॅम्प्स समाविष्ट केले आहेत. या व्यतिरिक्त, यामध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.

कंपनीने या कारमध्ये पॉवर स्पेसिफिकेशनच्या बाबतीत कोणतेही नवीन बदल केलेले नाहीत. कंपनीने यात 1.5 लिटरचे  mHawkD70 डिझेल इंजिन दिले आहे. हे इंजिन 70 बीएचपीची पॉवर आणि 195 एनएमची टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. कंपनीने यावर्षी जुलैमध्ये घोषणा केली होती की, बोलेरो पॉवर प्लस मॉडेलला बीएस 6 प्रमाणपत्र आंतरराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी) च्या माध्यमातून प्राप्त झाले आहे. बीएस 6 मानकांच्या अनुषंगाने हे मॉडेल 2020 च्या सुरुवातीला बाजारात आणले जाईल. महिंद्राने यापूर्वीच हिंदुस्थानात बोलेरोच्या 1.2 दशलक्ष युनिट्सची विक्री केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या