‘या’ दोन सीएनजी कार देतात 31 हून अधिकचा मायलेज; किंमत किती? 

3377

आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेल कारपेक्षा सीएनजी कार अधिक किफायतशीर सिद्ध होत आहे. पेट्रोल-डिझेल कारच्या तुलनेत सीएनजी कार कमी प्रदूषण करते. सीएनजी कारची सर्वात खास बाब म्हणजे त्याचे मायलेज. सीएनजी कार पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कारपेक्षा अधिक मायलेज देते. आज आम्ही तुम्हाला अशाच दोन सीएनजीवर चालणाऱ्या कार बद्दल सांगणार आहोत. ज्या 31 हून अधिकचा मायलेज देतात. चला तर जाणून घेऊन कोणत्या आहेत या कार…

Maruti Suzuki Alto

कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीची Maruti Suzuki Alto ही देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. यामध्ये 796 सीसीचे 3 सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. जे 6000 Rpm वर 30.1 kw पॉवर आणि 3500 Rpm वर 60 Nm टॉर्क जनरेट करते. या कारची किंमत 2,88,689 रुपये इतकी आहे. ही कार 32.99 किमी प्रति किलो सीएनजी मायलेज देऊ शकते.

Maruti Suzuki Celerio

Maruti Suzuki Celerio मध्ये 998CC चे 4 सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. जे 6000 Rpm वर 50 kw पॉवर आणि 3500 Rpm वर 90 Nm टॉर्क जनरेट करते. या कारची किंमत 4,31,289 रुपये इतकी आहे. ही कार 31.76 किमी प्रति किलो सीएनजी मायलेज देऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या