‘ही’ आहे सर्वात स्वस्त फॅमिली कार; देते 31.76 किमीचा मायलेज

8610

देशात पेट्रोलचे भाव हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशातच स्वस्त पर्याय म्हणून अनेक जण डिझेल कारकडे आकर्षित होत आहेत. मात्र डिझेल कारची किंमत ही पेट्रोल कारच्या किंमतीपेक्षा अधिक असते. अशा परिस्थितीत लोकांकडे ‘सीएनजी’ हा एकच पर्याय उरतो. अशातच जर तुम्ही नवीन सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला Maruti Suzuki Celerio या कार बद्दल सांगणार आहोत. ही कार स्टाईलिश असण्यासोबतच दमदार मायलेज देते आणि कुटुंबासाठी फिट देखील आहे.

Maruti Suzuki Celerio मध्ये 998cc इंजिन देण्यात आले आहे. जे 6000 Rpm वर 50 kw पॉवर आणि 3500 Rpm वर 90 Nm टॉर्क जनरेट करते. मायलेज बद्दल बोलायचं झालं तर पेट्रोल व्हेरियंटमध्ये ही कार 23.10 किमीचा मायलेज देते. तर सीएनजी व्हेरियंटमध्ये 31.76 किमीचा मायलेज देते. तसेच यामध्ये 5 जणांची आसन क्षमता आहे. यात 35 लीटरची इंधन टाकी देण्यात आली आहे.

किंमत

Maruti Suzuki Celerio ची एक्स शोरूम किंमत ही 4,31,289 इतकी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या