999 मध्ये बाईक; तर 99 हजारांत लक्झरी कार मिळवा.. वाचा कशी?

शीर्षक वाचून विचारात पडलात ना? 999 रुपयांत बाईक? कसं काय शक्य आहे? मात्र हो हे खरं आहे. हिंदुस्थानात सणांचा मोसम सुरू झाला आहे. अशातच हिंदुस्तानातील सर्वात मोठी आणि आघाडीची ऑटोमोबाईल बाजारपेठ असलेल्या Droom ने आपल्या वार्षिक ‘दिवाळी ऑटो मेळाव्या’ची घोषणा केली आहे. 6 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या काळात सुरू होणारी ही विक्री या वर्षी अधिक मोठी आणि व्यापक असणार आहे.

2018 मध्ये हा मेळावा 25 कोटींच्या बजेटसह 4 आठवडे चालला होता. यावर्षी कंपनी पुन्हा एकदा या मेळाव्यासह बाजारात परतली आहे. यावर्षी 8 आठवडे आणि 50 कोटींसह हा मेळावा प्रचार आणि कालावधी या दोन्हींच्या मानाने अधिक भव्य असणार आहे. याव्यतिरिक्त जुन्या आणि नवीन वाहनांच्या अनेक ऑफर्स ग्राहकांना मिळणार आहेत. ज्यामध्ये दुचाकी, चारचाकी वाहन, कर्ज, विमा, प्रमाणपत्र आणि कार केअर आणि इतर अशा अनेक आकर्षक ऑफरचा समावेश आहे.

या दिवाळी मेळाव्यात कंपनीने अनेक अशा ऑफर्स दिल्या आहेत, ज्या नाकारणे कठीण आहे. चला तर पाहू काय आहेत या ऑफर्स :

  • एक बाईक / स्कूटर  @ 999 रुपये (EDI) (प्रतिदिन)
  • एक कार @ 9,999 रुपये (EWI) (प्रतिआठवडा)
  • एक लक्झरी कार @ 99,999 रुपये (EMI) (दरमहा)
  • विमा – प्रीमियमवर 15% पर्यंत कॅशबॅक, 75% पर्यंत सूट
  • आरएसए – 25 रुपयांपासून प्रारंभ
  • अ‍ॅक्सेसरीज – 9 रुपयांपासून प्रारंभ – हेल्मेट, कार परफ्यूम

याव्यतिरिक्त, जे ग्राहक ईएमआयची निवड करतील, त्यांना पहिल्या 3 महिन्यांसाठी ‘नो ईएमआय’ ची खास ऑफर मिळेल. तसेच Droom miles loan व विमा घेणार्‍या ग्राहकांना एक प्रक्रिया शुल्क कंपनीतर्फे दिले जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या