Honda Activa 125 BS-VI हिंदुस्थानात लॉन्च; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

3751

प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी होंडाने Honda Activa 125 चे नवीन बीएस-6 व्हेरियंट लॉन्च केले आहे. नवीन होंडा अ‍ॅक्टिव्हा जुन्या व्हेरियंटपेक्षा 13 टक्के अधिक मायलेज देईल, तसेच ही नवीन अ‍ॅक्टिव्हा पूर्वीपेक्षा अधिक इकोफ्रेंडली असणार आहे. चला तर या स्कूटरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

हिंदुस्थानातील सर्वोच्च न्यायालयाने 1 एप्रिल 2020 पासून हिंदुस्थानात कोणतेही स्टेज IV वाहन विकण्यास बंदी घातली होती. यानंतर हिंदुस्थानात बीएस-6 मानक असलेली वाहनेच विकत घेता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर सर्व ऑटोमोबाइल कंपन्यांनी आपल्या वाहनांमध्ये बदल केले आहेत. याच दरम्यान होंडाने आपली सर्वाधिक विक्री होणारी स्कुटर ही BS-IV च्या अनुरूप केली आहे.

पॉवर आणि स्पेसिफिकेशन

Honda Activa 125 मध्ये  125cc चे BS-VI PGM FI इंजिन देण्यात आले आहे.

फीचर्स

फीचर्स बद्दल सांगायचे झाले तर या स्कूटरमध्ये ड्युअल फंक्शन स्विचसह 5 इन 1 लॉक, संपूर्ण मेटल बॉडी, एलईडी हेडलॅम्प्स, एलईडी पोजिशन लॅम्प आणि असे अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.

डायमेन्शन

Honda Activa 125 ची लांबी 1814mm, रुंदी 704mm, उंची 1151mm असून याचे वजन 108 किलो आहे. यामध्ये 5.3 लीटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे.

किंमत

Honda Activa 125 ची एक्स-शोरूम किंमत 67,490 हजार रुपये इतकी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या