Honda Activa 6G हिंदुस्थानात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

1775

प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी होंडाने बुधवारी हिंदुस्थानात आपली नवीन Activa 6G लॉन्च केली आहे. ही स्कूटर होंडा अॅक्टिव्हाचा 6 जनरेशन मॉडेल आहे. जो स्टँडर्ड आणि डिलक्स या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने या स्कूटरची बुकिंग सुरु केली आहे. आज आम्ही तुम्हाला या स्कुटरच्या किंमत आणि फीचर्सबद्दल सांगणार आहोत.

इंजिन आणि पॉवर

Activa 6G मध्ये BS-6 109cc इंजिन देण्यात आले आहे. जे 8000 Rpm वर 7.68 Bhp पॉवर आणि 5250 Rpm वर 8.79 Nm टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर जुन्या अॅक्टिव्हाच्या तुलनेत अधिक मायलेज देईल असं कंपनीचे म्हणणे आहे.

फीचर्स

Honda Activa 6G मध्ये नवीन स्टॉप सिस्टम, इंधन इंजेक्शन तंत्रज्ञान, ब्लूटूथ स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी फीचर्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देण्यात आले आहे.

किंमत

कंपनीने Honda Activa 6G ची किंमत 63,912 रुपये इतकी ठेवली आहे. जी Activa 5G च्या तुलनेत अधिक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या