होंडाच्या ‘या’ स्कुटरवर मिळत आहे भरघोस डिस्काउंट

1353

होंडा आपल्या दुचाकी वाहनांसाठी हिंदुस्थानी बाजारपेठेत खूप लोकप्रिय आहे. Honda Activa स्कूटर ही हिंदुस्थानातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटर पैकी एक आहे. अशातच कंपनीने आपल्या Honda Activa 125 या स्कुटरवर मोठे डिस्काउंट जाहीर केले आहे. चला तर जाणून घेऊ या स्कुटरची किंमत फीचर्स आणि ऑफर बद्दल.

Honda Activa 125 मध्ये 124cc चे इंजिन देण्यात आले आहे. जे 6500 Rpm वर 8.18 Hp पॉवर आणि 5 हजार Rpm वर 10.3 Nm टॉर्क जनरेट करते. या स्कुटरची लांबी 1850 मिमी, रुंदी 707 मिमी, उंची 1170 मिमी, व्हीललेस 1260 मिमी आहे. याचे एकूण वजन 111 किलो आहे. या स्कूटरमध्ये 5.3 लीटरची इंधन टाकी देण्यात आली आहे.

ऑफर आणि किंमत

या स्कॉउटरची एक्स शोरूम किंमत 67,490 रुपये इतकी आहे. कंपनीने या स्कुटरच्या खरेदीवर 10 हजार रुपयांची सूट जाहीर केली आहे. तसेच Paytm ने ही स्कूटर खरेदी केल्यास 7 हजार रुपयांपर्यंतचे आकर्षक कॅशबॅक दिले जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या