Honda SP 125 BS6 हिंदुस्थानात लॉन्च; किंमत किती? 

1552

दुचाकी निर्माता कंपनी होंडाने आपली नवीन बाईक ‘Honda SP 125 BS6’ हिंदुस्थानात लॉन्च केली आहे. कंपनीने याची प्रारंभिक (एक्स-शोरुम) किंमत 72,900 रुपये इतकी ठेवली आहे. देशात 1 एप्रिलपासून बीएस 4 इंजिन असणारे वाहन बंद होणार आहेत. होंडाने आपली ही नवीन बाईक बीएस इंजिन 6 च्या मापदंडानुसार लॉन्च केली आहे. बीएस इंजिन 6 सह होंडाने ही दुसरी दुचाकी हिंदुस्थानात लॉन्च केली आहे. याआधी होंडाने ‘अॅक्टिवा 125 बीएस 6’ लॉन्च केली होती.

नवीन होंडा SP 125 मध्ये कंपनीने अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. ज्यात एलईडी डीसी हेडलॅम्प्स, शार्पर बॉडीवर्क, नवीन बॉडी ग्राफिक्स आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेल सारख्या फीचर्सचा समावेश आहे. स्ट्रायकिंग ग्रीन, मॅट केस ग्रे मेटलिक,  इम्पीरियल रेड मेटलिक आणि पर्ल सायरन ब्लू या रंगात ही बाईक ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

कंपनीने Honda SP 125 मध्ये 124 सीसी 4-स्ट्रोक SI इंजिन दिले आहे. जे 7500 rpm वर 10.7 bhp पॉवर आणि 6000 rpm वर 10.9 Nm टॉर्क जनरेट करते. याची मोटर 5 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. ही बाईक ड्रम आणि डिस्क या व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे. याच्या डिस्क व्हेरियंटची किंमत (एक्स-शोरूम) 77,180 रुपये इतकी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या