Hyundai ने सादर केली नवीन इलेक्ट्रिक कार Mistra, सिंगल चार्जमध्ये चालते 520km

जगभरात सुरु असलेल्या कोरोना संकटामुळे अनेक ऑटो शो रद्द करण्यात आले आहेत. मात्र अशातच चीनमध्ये ‘2020 गुआंगझो मोटर शो’ सुरु झाला आहे. ज्यात अनेक आंतरराष्ट्रीय वाहन उत्पादक कंपन्यांनी भाग घेतला आहे. यात वाहन उत्पादक कंपनी Hyundai ने आपली नवीन जनरेशन इलेक्ट्रिक कार Mistra सादर केली आहे. जी कॉम्पॅक्ट सेदान कार आहे. कंपनीने ही कार खास करून चिनी बाजाराला लक्षात घेऊन तयार केली आहे.

सिंगल चार्जमध्ये चालते 550km

या कारवरून जागतिक बाजारात मोठी चर्चा रंगली आहे. कारण ही कार तुम्ही 1.58 लिटर पेट्रोल इंजिनमध्ये, 1.8-लिटर गॅसोलीन इंजिन आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक व्हेरिएंटमध्ये खरेदी करू शकता. याचा इलेक्ट्रिक व्हेरिएंट एकदा संपूर्ण चार्ज झाल्यावर ही कार 550km पर्यंत धावू शकते, असा कंपनीने दावा केला आहे. यात 56.5 kWh बॅटरी देण्यात आली आहे. जी 188 पीएस पॉवर आणि 229 एनएम टॉर्क जनरेट करते.

दरम्यान, हिंदुस्थानात नुकतीच Hyundai कंपनीने आपली नवीन i20 कार लॉन्च केली आहे. ज्याची फक्त 20 दिवसात 20,000 युनिट्सची बुकिंग झाली आहे. या कारच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

आपली प्रतिक्रिया द्या