फक्त पाच मिनिटात KTM स्पोर्ट बाईकच्या 100 युनिट्सची विक्री, जाणून घ्या काय आहे कारण…

आघाडीची दुचाकी निर्माता कंपनी KTM ने मागील आठवड्यात आपली बहुचर्चित स्पोर्ट्स बाईक RC 8C सादर केली होती. ही बाईक विक्रीसाठी उपलब्ध होताच अवघ्या 5 मिनटात आऊट ऑफ स्टोक झाली आहे. कंपनीने या बाईकच्या 100 युनिट्स विक्रीसाठी उपलब्ध केल्या होत्या. ज्याच्या विक्रीसाठी केवळ 4 मिनिटे 32 सेकंदाचा वेळ लागला आहे.

इंजिन आणि पॉवर

KTM RC 8C या बाईकमध्ये 890 Duke चे पॉवरफुल्ल इंजिन देण्यात आले आहे. यात 889 cc parallel ट्वीन LC8c इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 123 bhp ची पॉवर आणि 101 Nm टॉर्क जनरेट करते.

KTM RC 8C ही एक ट्रॅक बाईक आहे. जी केटीएम फॅक्टरी रेसिंग टीम आणि यूएस-आधारित क्रेमर मोटरसायकलने संयुक्तपणे विकसित केली आहे. 8 C च्या डिझाइनमध्ये सर्वाधिक लक्ष याच्या फ्रंट फेअरिंगकडे जात.

दरम्यान, ही बाईक खरेदी केलेल्या 100 भाग्यवान ग्राहकांपैकी 25 ग्राहक विशेष ट्रॅक अनुभवाची निवड करू शकतात. याच्या पॅकेजमध्ये पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेकची एक जोडी, डायमंड व्हील्सचा अतिरिक्त सेट, टायर वॉर्मर, केटीएम रेस कार्पेटचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या