Kawasaki Versys 650 BS6 हिंदुस्थानात लॉन्च; नवीन ग्राफिक्ससह मिळेल ‘हे’ फीचर्स

646

India Kawasaki Motors ने हिंदुस्थानी बाजारात आपली नवीन Kawasaki Versys 650 BS6 बाईक लॉन्च केली आहे. या बाईकमध्ये कंपनीने इंधन टाकीवर नवीन ग्राफिक्स डिझाइन दिले आहे. आज आम्ही तुम्हाला याच बाईकच्या किंमत आणि फीचर्स बद्दल सांगणार आहोत.

नवीन Kawasaki Versys 650 BS6 मध्ये तुम्हाला जुन्या बाईकच्या तुलनेत फारसा बदल दिसणार नाही. कारण या बाईकचे बरेच फीचर्स जुन्या बाईक सारखेच आहेत. तसेच याच्या लूकमध्ये ही तुम्हाला फारसा बदल पाहायला मिळणार नाही. कंपनीच्या डीलरशिपकडे या बाईकची बुकिंग सुरु झाली आहे. तुम्ही 50,000 रुपयांचा टोकन देऊन ही बाईक बुक करू शकता.

इंजिन आणि पॉवर

Kawasaki Versys 650 BS6 मध्ये 649 cc चे इंजिन देण्यात आले आहे. जे 8500 rpm वर 65 bhp आणि 7000 rpm वर 61Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहे.

किंमत

Kawasaki Versys 650 BS6 या बाईकची किंमत 6.79 लाख रुपये इतकी आहे. ही बाईक कँडी लाइम ग्रीन शेडमध्ये लॉंच करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या