TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर हिंदुस्थानात लॉन्च; 78Kmph आहे टॉप स्पीड

1412

दुचाकी निर्माता कंपनी टीव्हीएसने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर iQube हिंदुस्थानी बाजारात लॉन्च केली आहे. चेन्नईस्थित कंपनीने iQube च्या माध्यमातून ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात उतरवली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या माध्यमातून टीव्हीएसने ‘हीरो इलेक्ट्रिक’ आणि ‘होंडा’च्या इलेक्ट्रिक स्कूटरला आव्हान दिले आहे. टीव्हीएसने सध्या 10 डिलरशिपसह बंगळुरूमध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. या स्कुटरला फेब्रुवारीत होणाऱ्या Auto Expo 2020 मध्ये कंपनी प्रदर्शित करणार आहे.

TVS iQube मध्ये 4.4kW इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यांनुसार या इलेक्ट्रिक स्कूटरची टॉप स्पीड ताशी 78 किलोमीटर असू शकते. एकदा संपूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर 75 किमी पर्यंत चालू शकते. ही स्कूटर फक्त 4.2 सेकंदात 0 ते 40 प्रति किलोमीटरची गती प्राप्त करते.

किंमत

TVS iQube ची ऑन-रोड ही 1.15 लाख रुपये आहे.

आपली प्रतिक्रिया द्या