‘महिंद्रा’ आपल्या एसयूव्हीवर देत आहे 3 लाखांचा डिस्काउंट; काय आहे ऑफर?

5191

कोरोना संकटामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका ऑटो सेक्टरला बसला आहे. अशातच अनेक वाहन कंपन्यांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. ही घट भरून काढण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या एसयूव्हीवर मोठी सवलत जाहीर केली आहे. मे, जून महिन्यात मोठी सवलत दिल्यानंतरही कंपनी जुलैमध्येही आपल्या एसयूव्ही विक्रीला चालना देण्यासाठी 3.05 लाख रुपयांपर्यंत ऑफर देत आहे.

महिंद्राची सर्वाधिक विक्री होणाऱ्या Mahindra XUV300 वर कंपनी 64,500 रुपयांची सवलत देत आहे. ज्यात 30,000 कॅश सवलत आणि 25,000 रुपये अॅक्सेंज सवलत देत आहे. तसेच 4,500 रुपये कॉर्पोरेट सवलत आणि 5 हजार रुपये अतिरिक्त सवलत देत आहे. यासोबतच Mahindra XUV500 वर कंपनी 39,000 रुपयांपर्यंत सवलत देत आहे. ज्यात 30,000 रुपये अॅक्सेंज सवलत आणि 9,000 रुपये कॉर्पोरेट सवलत देत आहे.

कंपनी Mahindra Scorpio वर 60,000 रुपये सवलत देत आहे. तर Mahindra Bolero वर 13,500 रुपयांची सवलत देत आहेत. यातच महिंद्रा Mahindra Alturas G4 या आपल्या फ्लॅगशिप एसयूव्हीवर सर्वाधिक 3.05 लाखांची सवलत देत आहे. ज्यात 2.40 लाख रुपये कॅश सवलत, 50,000 रुपये अॅक्सेंज सवलत आणि 15,000 रुपये कॉर्पोरेट सवलत देत आहे. अधिक माहितीसाठी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

आपली प्रतिक्रिया द्या