Mahindra घेऊन येत आहे हिंदुस्थानातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही, सिंगल चार्जमध्ये गाठणार 147 किमीचा पल्ला…

Mahindra and Mahindra यावर्षी आपल्या अनेक प्रसिद्ध एसयूव्हीचे अपडेट मॉडेल सादर करणार आहे. यात महिंद्रा स्कॉर्पिओ आणि महिंद्रा एक्सयूव्ही 500 चाही समावेश आहे. हे मॉडेल डिजाइन आणि फीचर्स अपडेट करून हिंदुस्थानी बाजारात उतरवण्यात येणार आहे.

कंपनी लवकरच आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही KUV100 लाँच करू शकते. ही हिंदुस्थानातील सर्वात स्वस्त एसयूव्ही असेल. ही एसयूव्ही सिंगल चार्जमध्ये 147 किमी धावू शकते. या एसयूव्हीच्या लॉन्चबद्दल अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. आज आम्ही तुम्हाला महिंद्राच्या या एसयूव्हीशी संबंधित काही विशेष माहिती सांगणार आहोत.

या एसयूव्हीत केबिन प्री-कूलिंग, फुल टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, कनेक्ट कार फिचर, रिमोट डायग्नोस्टिक्स, लोकेशन ट्रॅकिंग तसेच स्टीयरिंग माऊंट ऑडिओ कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहे. तसेच यात मॅन्युअल वातानुकूलन रिमोट आणि सेंट्रल लॉक सारखेही फीचर्स दिले आहेत.

ही इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑटो एक्सपो 2020 मध्ये सादर करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, यात 15.9 किलोवॅटची लिक्विड कुल मोटार देण्यात आली आहे. जी 120 एनएम टॉर्कसह 54 पीची पॉवर जनरेट करते. 80 टक्के चार्ज होण्यासाठी ही एसयूव्ही फक्त 50 मिनिटांचा वेळ घेते, असा कंपनीने दावा केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या