26.82 kmpl चा मायलेज देते ‘ही’ कार, कंपनी देतेय 1.13 लाखांची सूट

1766

वर्षाचा शेवटचा महिना सुरु झाला असून अनेक कार उत्पादक कंपनी इयर एंडिंगच्या निमित्ताने आपल्या कारवर मोठी सूट देत आहे. अशातच Maruti Suzuki ने आपल्या कारवर मोठी सूट जाहीर केली आहे. यात ग्राहक सवलत, एक्सचेंज बोनस, फ्री वॉरंटी आणि कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. आज आम्ही तुम्हाला Maruti Suzuki Ciaz बद्दल संगर आहोत. ज्याची विक्री प्रीमियम डीलरशिप चैन Nexa Dealerships वर होते. आज आम्ही तुम्हाला या कारचे फीचर्स, किंमत आणि याच्यावर मिळणाऱ्या सूट बाबत सांगणार आहोत.

Maruti Suzuki Ciaz-Petrol: या डिसेंबरमध्ये आपण Maruti Suzuki Ciaz पेट्रोल वेहिकल खरेदी केल्यास तुम्हाला 75,000 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या ऑफर्समध्ये 25,000 रुपयांची ग्राहक ऑफर आणि 40,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनस दिला जात आहे. यासोबतच कंपनी ग्राहकांना 10,000 कॉर्पोरेट बोनस ही देत आहे.

Maruti Suzuki Ciaz- Diesel: Maruti Suzuki Ciaz डिझेल खरेदी केल्यास कंपनी तुम्हाला 1.13 लाखांची सूट देत आहे. कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या ऑफर्समध्ये 40,000 रुपयांची ग्राहक ऑफर आणि 40,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनस दिला जात आहे. तसेच 10,000 कॉर्पोरेट बोनस आणि 5 वर्षाची फ्री वॉरंटी दिली जात आहे.

किंमत

Maruti Suzuki Ciaz-Petrol ची एक्स-शोरूम किंमत ही 8.20 लाख रुपये इतकी आहे. तर Maruti Suzuki Ciaz- Diesel वेहिकलची किंमत 9.20 लाख रुपये इतकी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या