आता घरी घेऊन जा कार, दोन महिन्यानंतर द्या पैसे; मारुतीची खास ऑफर

4904

जगभरात ओढवलेल्या कोरोना विषाणूचा फटका अनेक उद्योगधंद्यासह ऑटोमोबाईल क्षेत्रालाही बसला आहे. कार विक्रीत मोठी घट झाली आहे. कारच्या विक्रीत तेजी यावी म्हणून कार निर्माता कंपन्या अनेक नवनवीन ऑफर ग्राहकांना देत आहेत. अशातच आता देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने ग्राहकांना एक नवीन ऑफर दिली आहे. ‘बाय नाऊ, पे लेटर’ (आता खरेदी करा आणि नंतर पैसे द्या) अशी ही ऑफर आहे. यामध्ये कंपनीने 90 टक्के ऑन-रोड फंडिंग आणि दीर्घ मुदतीच्या कर्जासह इतर पर्याय देखील दिले आहेत.

नवीन फायनान्स योजनांसाठी मारुती सुझुकीने चोलामंडलम इनव्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड (सीआयएफसीएल) सह भागीदारी केली आहे. मारुती सुझुकी म्हटले आहे की, या भागीदारीचा उद्देश ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार ऑटो रिटेल फायनान्सिंग सोल्यूशन प्रदान करणे आहे.

कार खरेदी केल्याच्या दोन महिन्यांनंतर सुरु होणार ईएमआय

बाय नाऊ पे लेटर योजने अंतर्गत, मारुती कार खरेदी करणाऱ्या ग्राहकाला ईएमआय सुरू करण्यासाठी 60 दिवसांचा अवधी मिळेल. याचा अर्थ जर आपण आता मारुतीची कार खरेदी केली, तर याचे ईएमआय कार कर्ज घेतल्याच्या 2 महिन्यांनंतर सुरू होईल. ही ऑफर मारुतीच्या निवडक कारवर उपलब्ध आहे. 30 जून 2020 रोजी किंवा त्यापूर्वी घेतलेल्या कर्जावर ही ऑफर लागू होईल.

आपली प्रतिक्रिया द्या