मारुती सुझुकीच्या ‘या’ कारची विक्री होणार बंद

15151

मारुती सुझुकी हिंदुस्थानी बाजारात आपल्या स्वस्त आणि स्टाईलिश कारसाठी ओळखली जाते. मारुती सुझुकीने आपली प्रीमियम स्टोअर नेक्सा मार्फत विकली जाणारी Maruti Suzuki S-Cross च्या डिझेल व्हेरिएंटची विक्री बंद करणार आहे. आता कंपनी या कारचे पेट्रोल व्हेरिएंट बाजारात आणणार असून बीएस -6 इंजिन नवीन निकषांतर्गत आल्याने कंपनीने हे पाऊल उचलले आहे. एप्रिल 2020 पासून हिंदुस्थानी बाजारात फक्त बीएस -6 इंजिन वाहनांची नोंदणी होईल. तर जुन्या इंजिन कारची नोंदणी बंद केली जाईल आहे.

सध्या मारुती सुझुकी S-Cross मध्ये 1248 सीसी डिझल इंजिन दिले आहे. जे 4000 आरपीएम वर 66 केडब्ल्यूची पॉवर आणि 1750 आरपीएमवर 200 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनने सुसज्ज आहे. ही कार 25.1 किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देते.

किंमत

Maruti Suzuki S-Cross ची एक्स-शोरूम किंमत 8,80,689 रुपये इतकी आहे. ही कार नवीन पेट्रोल इंजिनसह लॉन्च झाल्यावर याची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या