लोकप्रिय Maruti Swift चा लिमिटेड एडिशन लॉन्च, किंमत फक्त…

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुतीने आपल्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय असलेल्या Swift कारचा लिमिटेड एडिशन हिंदुस्थानी बाजारात लॉन्च केला आहे. ज्यामध्ये कंपनीने डिझाईनसह केबिनमध्ये कॉस्मेटिक अपडेट केले आहेत. स्विफ्टचा लिमिटेड एडिशन सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत खूप वेगळा आहे. यात ऑल-ब्लॅक कलर थीम वापरण्यात आली आहे.

Maruti Swift च्या सध्याच्या मॉडेलमध्ये L, V, Z आणि Z + व्हेरिएंट उपलब्ध आहे. यात BS6 1.2-लिटर पेट्रोल युनिटचा उपयोग करण्यात आला आहे. जे 83PS वर पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करतो. या मोटरसह 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी गीअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे. ही कार 21.21kmpl मायलेज देते.

किंमत

नवीन मॉडेल एडिशन सध्याच्या मॉडेलच्या किंमतीपेक्षा सुमारे 24,000 रुपये अधिक किंमतीत बाजारात लॉन्च करण्यात आले आहे. सध्या स्विफ्टची किंमत 5.19 लाख रुपयांपासून सुरु होते. या एडिशनच्या LXI ट्रिमची किंमत 5.43 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

आपली प्रतिक्रिया द्या