Mercedes Benz G350d हिंदुस्थानात लॉन्च, किंमत किती?

2188

जर्मनीची प्रसिद्ध कार निर्माण कंपनी ‘Mercedes Benz’ ने बुधवारी आपली नवीन G-class एसयूव्ही ‘Mercedes Benz G350d’ हिंदुस्थानात लॉन्च केली आहे. Mercedes ची G-class ही आताच्या घडीला ऑफ-रोड वाहनांमध्ये हिंदुस्थानात सर्वात टॉपवर आहे. चला तर या कारबद्दल अधिक जाणून घेऊ.

पॉवर आणि स्पेसिफिकेशन

Mercedes Benz G350d या एसयूव्ही कारमध्ये कंपनीने 2925cc चे इंजिन दिले आले आहे. जे 3400-4600 Rpm वर  286 Hp पॉवर आणि 1200-3200 Rpm वर 600 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार 199 किमी प्रति तासाच्या वेगाने धावू शकते. तसेच 7.4 सेकंदा 0-100 किमी प्रतितास वेग धरू शकते.

या एसयूव्हीच्या लॉंचच्या वेळी मर्सिडीज बेंझ इंडियाचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेंक म्हणाले की, नवीन G350d सह आम्ही आमच्या ग्राहकांसाठी 15 हून अधिक खास AMG कार सादर करत आहोत. या वर्षाच्या अखेरीस आम्ही ग्राहकांसाठी लक्झरी सेगमेंटमध्ये एक खास प्रोडक्स्ट लॉन्च करणार आहे, अशी माहिती ही त्यांनी दिली आहे.

16_10_2019-mercedes_benz_g350d_19672786

G350d एडिशन हा पहिले नॉन-एएमजी G-class डिझेल वाहन आहे. कंपनीच्या एसयूव्ही पोर्टफोलिओमध्ये GLA, GLC, GLE, GLS Grand Edition, AMG GLC 43 4MATIC, GLE coupe आणि AMG G63 यांच्यासह आठ मॉडेल आहेत. Mercedes Benz G350d एक्स शोरूम किंमत ही 1.5 कोटी इतकी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या