एमजी मोटरची नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘झेडएस ईव्ही’ लॉन्च

806

मॉरिस गॅरेज मोटर इंडियाने गुरुवारी आपली नवीन इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही ‘झेडएस ईव्ही’ हिंदुस्थानात लॉन्च केली आहे. झेडएस ईव्हीही एमजीची पहिली विशुद्ध इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही आहे. ज्यात स्वच्छ, कार्यक्षम आणि जलद पॉवरट्रेन आहे. आज आम्ही तुम्हाला या कारचे फीचर्स आणि किंमत बद्दल सांगणार आहोत.

‘झेडएस ईव्ही’ कारमध्ये कंपनीने 44.5 केडब्ल्यूएच, लिक्विड कूल्ड एनएमसी (निकल मॅंगेनीझ कोबाल्ट) बॅटरी दिली आहे. जी संपूर्ण चार्ज झाल्यास 340 किमी प्रवास करण्याची क्षमता देते. यातील मोटर 353 एनएम इन्स्टंट टॉर्क आणि 143 पीएस पॉवर देते. ही कार केवळ 8.5 सेकंदात ताशी 100 किमी गती प्राप्त करून शकते, असं कंपनीचे म्हणणे आहे.

एमजी झेडएस ईव्ही मध्ये 8.0 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. जी  Apple carplay कारप्ले आणि Android ऑटोला सपोर्ट करते. यात फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील, यूएसबी मोबाईल चार्जिंग फ्रंट अँड रियर, ब्लूटूथ आणि रीअर व्यू कॅमेरा आहे.  कंपनीने अद्याप याच्या किंमत बद्दल घोषणा केलेली नाही. कंपनी जानेवारी 2020 मध्ये याची किंमत जाहीर करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या