Upcoming 7 Seater SUV – यावर्षी हिंदुस्थानात लॉन्च होणार ‘या’ 7 सीटर एसयूव्ही

हिंदुस्थानात अनेक लोक आपल्या कुटुंबीयांचा विचार करून अधिक आसनी कार घेणे पसंद करतात. यामुळेच देशात 7 सीटर कारची मागणी वाढताना दिसत आहे. आज आम्ही तुम्हाला 2021 मध्ये लॉन्च होणाऱ्या 7 सीटर एसयूव्ही बद्दल माहिती सांगणार आहोत.

महिंद्रा एक्सयूव्ही 500

स्वदेशी वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा या वर्षी आपल्या एसयूव्ही सेगमेंटची लोकप्रिय कार एक्सयूव्ही 500 नवीन अवतार लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही 7 सीटर एसयूव्ही असू शकते.

टेस्टिंग दरम्यान अनेकवेळा ही कार पाहण्यात आली आहे. आतापर्यंतच्या एक्सयूव्ही 500 चे जितके फोटो समोर आले, त्यावरून ही कार आधीच्या एक्सयूव्ही 500 पेक्षा वेगळी असले असे दिसून येत आहे. यात 2.2-लीटरचे अद्यावत mHawk डीझल इंजिन आणि नवीन mStallion 2.0-लिटर पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते.

स्कॉर्पिओ 2021

महिंद्रा अँड महिंद्रा या वर्षी यावर्षी स्कॉर्पिओ 2021 व्हेरिएंटही लॉन्च करू शकते. नवीन स्कॉर्पिओ गेल्या काही महिन्यांपासून टेस्टिंग दरम्यान पाहिली गेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याच्या इंजिनमध्ये कोणतेही बदल करण्यात येणार नसल्याचे समजते आहे. यात आधीचेच 2.2-लीटरचे mHawk डीझल इंजिन दिले जाऊ शकते. मात्र ही नवीन स्कॉर्पिओ आधीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक पॉवरफुल्ल असले. तसेच यात अनेक नवीन फीचर्स देखील देण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या