Okinawa ची नवीन इलेक्ट्रिक स्कुटर लाँच’ किंमत किती? 

पेट्रोल, डिझेलचे वाढते दर आणि वाढते वायू प्रदूषण पाहता भविष्यात इलेक्ट्रिक वाहने हा एकमेव पर्याय असल्याचे दिसून येत आहे. अशातच देशातील इलेक्ट्रिक वाहनांची निर्माती करणारी कंपनी Okinawa Scooters ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कुटर Okinawa Lite हिंदुस्थानात लाँच केली आहे. आज आम्ही तुम्हाला याच स्कुटरच्या फीचर्स आणि किंमत बद्दल सांगणार आहोत.

Okinawa ने या इलेक्ट्रिक स्कुटरची निर्मिती विशेषतः तरुणांना आणि महिलांना लक्षात घेऊन केली आहे. याचा उपयोग शहरांतर्गत असलेल्या शाळा, महाविद्यालय किंवा खरेदी इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी केला जाऊ शकतो. Okinawa आपल्या स्कुटरसह मोटर आणि बॅटरीवर तीन वर्षाची वॉरंटी देखील देत आहे. ग्राहकांना ही स्कुटर स्पार्कल व्हाइट आणि स्पार्कल ब्लू अशा दोन रंगांत खरेदी करता येणार आहे.

पॉवर और स्पेशिफिकेशन

Okinawa Lite मध्ये 250 वॉटची BLDC motor इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. याला पॉवर देण्यासाठी कंपनीने यात 40 V, 1.25  KWH लिथियम-आयन बॅटरी दिली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर 25 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. एकदा चार्ज झाल्यावर ही स्कुटर 50 ते 60 किती पर्यंत चालू शकते. या स्कूटरला पूर्णपणे चार्ज होण्यासाठी केवळ 4 ते 5 तास लागतात.

किंमत

Okinawa Lite स्कुटरची एक्स-शोरूम किंमत 59,990 रुपये इतकी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या