Renault Kiger गुरुवारी हिंदुस्थानात होणार सादर, किंमत फक्त 5 लाख…

फ्रेंच वाहन उत्पादक कंपनी Renault गुरुवारी आपली नविन एसयूव्ही Kiger हिंदुस्थानात सादर करणार आहे. कंपनी येत्या काही महिन्यांत हिंदुस्थानात अधिकृतपणे ही एसयूव्ही लॉन्च करणार आहे. Kiger ही देशात उपलब्ध असलेल्या Kia Sonet, Tata Nexon आणि Ford Ecosport ला टक्कर देईल. Kiger ला हल्लीच लाँच झालेल्या निसान मॅग्नाइट प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येणार आहे. या कॉम्पॅक्ट-एसयूव्हीला अनेक वेळा चाचणी दरम्यान पाहण्यात आले आहे.

स्पोर्टी डिझाइन

कंपनी यात एक स्कल्प्टेड टेलगेट, आकर्षक एलईडी टेल लैंप क्लस्टर, रिफ्लेक्टरसह हाई माउंट स्टॉप लैंप, आणि बम्पर देण्यात येणार आहे. याच्या पुढील बाजूस ब्लॅक बम्पर क्लेडिंग्ज, 16 इंचाच्या अ‍ॅलोय व्हील्स, ब्लॅक बी पिलर आणि रेग्युलर पुल टाईप डोर हँडल्स दिला जाऊ शकतो. या एसयूव्हीचा लूक खूपच स्टाईलिश आणि स्पोर्टी असणार आहे.

इंजिन आणि किंमत

कंपनी यात 1.0-लिटर थ्री सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन देऊ शकते. या व्हेरिएंटमध्ये कंपनी सीव्हीटी स्वयंचलित ट्रान्समिशनचा समावेश करेल अशी अपेक्षा केली जात आहे. दरम्यान, कंपनीने याच्या अधीकृत किंमत बद्दल घोषणा केलेली नाही. मात्र याची किंमत 5 लाख रुपये ठेवण्यात येईल अशी अपेक्ष केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या