Renault च्या ‘या’ कारवर मिळत आहे 70 हजारांची सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर…

हिंदुस्थानात फेस्टिव्ह सीजनची सुरुवात झाली आहे. अशातच कार निर्माता कंपनी Renault आपल्या गाड्यांवर बंपर डिस्काउंट देत आहे. तुम्ही कार खरेदी करायचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. Renault आपल्या तीन कारवर डिस्काउंट देत आहे. आज आम्ही तुम्हाला याच कारवर कंपनी देत असलेल्या ऑफर्स बद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ काय आहे ऑफर…

Renault Kwid – कंपनी आपल्या या कारवार 40,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. या ऑफरमध्ये ग्राहकांना 9,000 रुपयांपर्यंतची कॉर्पोरेट सूट देण्यात येणार असून ग्रामीण भागातील ग्राहकांना खास ऑफर देण्यात येणार आहे. तसेच या ऑफरमध्ये ग्राहकांना 3.99 टक्के विशेष व्याज दरही देण्यात येणार आहे.

Renault Triber – हिंदुस्थानात कारची किंमत 5.12 लाख रुपयांपासून सुरु होते. कंपनी या कारवर 30,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. यात ग्राहकांना 9,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट मिळणार असून ग्रामीण ग्राहकांना विशेष ऑफर दिल्या जातील.

Renault Duster – या कारची किंमत कंपनीने 8.59 लाख रुपये ठेवली आहे. Renault DUSTER – 1.5L वर कंपनी 70,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे. ज्यामध्ये ग्राहकांना 30,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट मिळणार असून ग्रामीण ग्राहकांना विशेष ऑफर दिल्या जातील. या कारवर कंपनी 20,000 लॉयल्टी बेनिफिट्स, 3 वर्ष किंवा 50,000 किमीपर्यंत कार धावल्यास केअर पॅकेज देत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या