Suzuki Burgman Street BS6 हिंदुस्थानात लॉन्च; किंमत किती?

860

दुचाकी निर्माता कंपनी Suzuki ने आपली नवीन Suzuki Burgman Street स्कूटर BS6 इंजिनसह हिंदुस्थानात लॉन्च केली आहे. कंपनीने आपल्या या नवीन स्कूटरमध्ये अनेक नवीन फीचर्स दिल आहेत. आज आम्ही तुम्हाला या स्कूटरच्या फीचर्स आणि किंमत बद्दल सांगणार आहोत.

Suzuki Burgman Street BS6 च्या समोरील बाजूस 90 व 90-12 54 ट्यूबलेस टायर्स आणि मागील बाजूस 90-10-10 ट्युलबेस टायर्स आहेत. या स्कूटरच्या इलेक्ट्रिकल सिस्टमविषयी बोलायचे झाले तर यामध्ये मेंटेनन्स फ्री 12 व्ही, 3 एएच बॅटरी देण्यात आली असून यात एलईडी हेडलाइटही देण्यात आली आहे.

इंजिन

Suzuki Burgman Street BS6 मध्ये 124cc चे 4 स्ट्रोक, सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. जे 6750 Rpm वर 8.7 PS पॉवर आणि 5500 Rpm वर 10 Nm टॉर्क जनरेट करते.

किंमत

Suzuki Burgman Street BS6 ची एक्स-शोरूम किंमत 77,900 रुपये इतकी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या