Suzuki च्या ‘या’ स्कूटरवर मिळत आहे आकर्षक ऑफर, सेफ्टीसाठी आहे बेस्ट..

अनलॉकमध्ये ऑटो इंडस्ट्री पुन्हा एकदा गती प्राप्त करताना दिसत आहे. अशातच दुचाकी निर्माता कंपनी Suzuki Motorcycle India आपली नवीन स्कूटर Suzuki Burgman Street च्या ऑनलाईन बुकिंगवर आकर्षक ऑफर देत आहे. तुम्हीही यावेळी स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

इंजिन आणि पॉवर

Suzuki Burgman Street मध्ये बीएस 6, 124 सीसी 4-स्ट्रोक सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. जे 6750 आरपीएम वर 8.7 PS आणि 5500 आरपीएम वर 10 एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच या स्कूटरमध्ये समोर 90-10 54 ट्यूबलेस टायर्स आणि मागील बाजूस 90-10-10 ट्यूलबेस टायर्स देण्यात आले आहे.

किंमत

Suzuki Burgman Street ची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 77,900 रुपये इतकी आहे. ब्रेकिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाल्यास याच्या समोरील बाजूस ड्रम ब्रेक आणि डिस्क पर्याय देण्यात आला आहे. तसेच मागील बाजूस ड्रम ब्रेक देण्यात आला आहेत.

काय आहे ऑफर?

Suzuki Burgman Street स्कूटर कंपनीच्या अधिकृत साइटवरून ऑनलाईन बुकिंग केल्यास कंपनी 3,000 रुपयांपर्यंतच्या अ‍ॅक्सेसरीज विनामूल्य देत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या