Tata Altroz i-Turbo हिंदुस्थानात लॉन्च, व्हॉईस कमांडसारख्या फीचर्सने आहे सुसज्ज..

Tata Motors ने आपल्या Altroz iTurbo प्रीमियम हॅचबॅकच्या किंमतीची घोषणा केली आहे. कंपनीने या मॉडेलच्या XT ट्रिम व्हॅरिएंटची किंमत 7.73 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे. तर याच्या टॉप मॉडेल XZ+ ट्रिम व्हॅरिएंटची किंमत 8.85 लाख (एक्स-शोरूम) रुपये ठेवली आहे. याबाबत माहिती देताना Tata Motors सांगितलं आहे की, कारची निश्चित केलेली किंमत ही प्रास्ताविक किंमत आहे. म्हणजेच आगामी काळात या किंमती वाढविल्या जाऊ शकतात.

नवीन हार्बर ब्लू कलरमध्ये नवीन तंत्रज्ञानासह सज्ज Altroz i-Turbo ला 1.2 एल टर्बोचार्ज्ड बीएस 6 पेट्रोल इंजिनसह लॉन्च करण्यात आले आहे. हे इंजिन 5500 rpm वर 110 PS पॉवर आणि 1500- 5500 rpm वर 140 Nm पॉवर टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये मल्टी ड्राईव्ह मोड देण्यात आले आहे. ज्यात स्पोर्ट आणि सिटीचा समावेश आहे.

फीचर्स

Altroz i-Turbo मध्ये ड्युअल एअरबॅग, कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल, ईबीडी असलेले एबीएस, रिअर पार्किंग सेन्सर्स, स्पीड वॉर्निंग अलर्ट सारखे फीचर्स देण्यात आहेत. तसेच यांच्यात व्हॉईस कमांडसारखे अत्याधुनिक फीचर्सही देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या