प्रजासत्ताक दिनी टाटा घेऊन येत आहे नवीन ‘SAFARI’, जाणून किंमत आणि फीचर्स…

टाटाची लोकप्रिय कार SAFARI पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हिंदुस्थानात लॉन्च होणार आहे. देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्स मंगळवारपासून टाटा सफारीसाठी बुकिंग सुरू करू शकते.

जर तुम्हाला ‘सफारी’ खरेदी करायची असेल तर तुम्ही कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा तुमच्या जवळ असलेल्या टाटा मोटर्स डीलरशिपला भेट देऊन बुक करू शकता. आज आम्ही आपल्याला या कारमध्ये उपलब्ध असलेले फीचर्स आणि किंमतीची माहिती सांगणार आहोत.

Tata Safari कारला आधी हॅरियरच्या 7 सीटर व्हेरिएंट ग्रॅविटास नावाचा टॅग देण्यात आला होता. मात्र आता ही कार टाटा सफारीच्या नावाने लॉन्च करण्यात येणार आहे. कंपनीने ऑटो एक्स्पो 2020 मध्ये पहिल्यांदा ही कार प्रदर्शित केली होती. नवीन टाटा सफारी 2021 एसयूव्हीमध्ये 2.0 लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन दिले जाऊ शकते. ज्यासह सहा-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि सहा-स्पीड एएमटी गियरबॉक्सचा समावेश असेल.

किंमत

सध्या या कारच्या किंमतीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र दावा केला जात आहे की, या कारची किंमत 15 लाखांपासून सुरू होऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या