TVS Sport – देशातील सर्वाधिक मायलेज देणारी बाईक, किंमत फक्त…

देशातील प्रसिद्ध दुचाकी उप्तादक कंपनी टीव्हीएस मोटर्सने नुकतीच आपली नवीन TVS Sport ला BS6 इंजिनसह अपडेट करून लॉन्च केली होती. या बाईकने पुन्हा एकदा ऑन रोड सर्वाधिक मायलेज देण्याचा विक्रम केला आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, टीव्हीएस स्पोर्टने एक लिटर इंधनात 110.12 किमीचा प्रवास केला आहे.

सर्वाधिक ऑन रॉड मायलेजसाठी या बाईकची इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. याआधीही टीव्हीएस स्पोर्टची बाईकची सर्वाधीक ऑन रॉड मायलेजसाठी या रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. मागील वर्षी या बाईकच्या बीएस 4 मॉडेलने 76.4 किमी प्रतिलिटरचे मायलेज दिले होते. या रेकॉर्डसाठी टीव्हीएस स्पोर्ट बाईकने 1021.90 किमीचा प्रवास केला आहे. हा प्रवास करत असताना या बाईकने 9.28 लिटर पेट्रोल वापरले आहे.

TVS Sport मध्ये 109.7cc चे इंजिन देण्यात आले आहे. जे 7350 Rpm वर 8.18 Hp ची पॉवर आणि 4500 Rpm वर 8.7 Nm टॉर्क जनरेट करते. या व्यतिरिक्त कंपनीने या बाईकमध्ये इकोथ्रस्ट फ्युएल टेक तंत्रज्ञानाचा समावेशही केला आहे. कंपनीचा असा दावा आहे की, ही बाईक मागील मॉडेलपेक्षा 15 टक्के अधिक मायलेज देईल. याचे इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्ससह येते.

किंमत

TVS Sport ची एक्स शोरूम किंमत ही 53,700 रुपये इतकी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या