Yamaha Fascino 125 FI हिंदुस्थानात लॉन्च, किंमत किती?

705

दुचाकी निर्माता कंपनी यामाहाने आपली नवीन Yamaha Fascino 125 FI स्कुटर हिंदुस्थानात लॉन्च केली आहे. हिंदुस्तानात या स्कुटरची स्पर्धा ही Honda Grazia, Honda Activa 125, Suzuki Access आणि TVS NTorq 125 या स्कुटरशी होणार आहे. चाल तर जाणून घेऊ या स्कुटरची किंमत आणि फीचर्स…

नवीन Yamaha Fascino 125 FI मध्ये कंपनीने 125 सीसीचा ब्लू कोर सिंगल-सिलिंडर, फ्यूल इंजेक्टेड इंजिन दिले आहे. जे 8 bhp पॉवर आणि 9.7 Nm टॉर्क जनरेट करते. नवीन 125 सीसी मोटर आताच्या 113 सीसी मॉडेलपेक्षा 30 टक्के अधिक पॉवरफुल्ल आहे, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच ही स्कुटर प्रति लीटर 58 किलोमीटर मायलेज देणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

ही स्कूटर स्टार्ट-स्टॉप सिस्टमसह येते, ज्यामध्ये तुम्हाला Traffic Mode ही मिळतो. यामुळे अधिक ट्रॅफिक असतानाही आपल्याला स्कुटर चालवण्याचा चांगला अनुभव मिळेल. या स्कुटरचे वजन वजन 99 किलो आहे. जी 113 मॉडेलपेक्षा 4 किलो हलकी आहे. सुरक्षिततेसाठी, यात एक युनिफाइड ब्रेकिंग सिस्टम किंवा सीबीएस मिळणार आहे. कंपनीने याची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 66,430 रुपये आहे.

आपली प्रतिक्रिया द्या