Yamaha FZS FI चा व्हिंटेज एडिशन हिंदुस्थानात लॉन्च, मिळणार ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी…

दिग्गज दुचाकी उत्पादक कंपनी Yamaha Motor India ने आपली लोकप्रिय बाईक FZS FI चा व्हिंटेज एडिशन हिंदुस्थानात लॉन्च केला आहे. ही बाईक अत्याधुनिक फीचर्ससह लॉन्च करण्यात आली आहे. या बाईकमधील सर्वात खास फिचर म्हणजे यात देण्यात आलेली ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी. तुम्ही ही बाईक आपल्या स्मार्टफोनशी कनेक्ट करू शकता.

Yamaha FZS FI बाईक तुम्ही Yamaha Motorcycle Connect X अॅपच्या साहाय्याने कनेक्ट करू शकता. एकदा ही बाईक स्मार्टफोनशी कनेक्ट झाल्यानंतर आपण बाईकमधील अनेक स्मार्ट फीचर्सचा वापर करू शकता. याद्वारे तुम्ही तुमची बाईक लॉकही करू शकता. हे फीचर्स तुम्हाला बाईक सुरक्षित ठेवण्यासाठी खूप उपयोगी पडू शकते.

इंजिन आणि पॉवर

Yamaha FZS FI मध्ये एयर-ऑईल कूल्ड, सिंगल सिलिंडर इंधन इंजेक्टेड 149 सीसी इंजिन देण्यात आले आहे. जे 12.4PS ची पॉवर आणि 13.6 Nm टॉर्क जनरेट करते.

किंमत

कंपनीने या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.09 लाख रुपये इतकी ठेवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या