लघुपटांतून कोरोनाविरोधात जनजागृती, मराठमोळ्या दिग्दर्शकाचे जागतिक स्तरावर कौतुक

हाडाचा कलाकार असतो तो कधीच स्वस्थ बसत नाही. तो काही ना काहीतरी ‘क्रिएटिव्ह’ करत असतो. लेखक आशीष निनगुरकर याने लॉकडाऊनचा रिकामा वेळ सत्कारणी लावत ‘नियम, कुलूपबंद आणि संक्रमण’ या तीन लघुपटांची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे ‘पोर्ट ब्लेयर’, ‘सिंगापूर’ व ‘इंडोनेशिया’ येथील फेस्टिक्हलमध्ये या लघुपटांनी वाहवा मिळवली आहे.

लघुपट मनोरंजनाबरोबर सामाजिक संदेश देतात. अशातच कोरोनाविषयक प्रबोधन करणाऱया आशीषच्या लघुपटांची आंतरराष्ट्रीय पातळीकर दखल घेण्यात आली आहे. या लघुपटांची नोंद याअगोदर कॅनडाच्या ‘वर्ल्ड ग्लोब’ या संस्थेने घेतली होती व त्याचा अनोखा असा प्रीमियर टोरंटोमध्ये पार पडला होता. आता या लघुपटांना ‘पोर्ट ब्लेयर’, ‘सिंगापूर’ व ‘इंडोनेशिया’ येथील फेस्टिव्हलमध्ये दाद मिळाली आहे. आशीषने कॅमेरामन, संकल्पना, लेखन व दिग्दर्शन अशी चौफेर धुरा सांभाळली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या