सुंदर दिसण्यासाठी फेसमास्क लावला….त्यानंतर ‘असा’ बदलला चेहरा…

चेहऱ्यावर कुठलाही प्रयोग करताना सावध राहाणे गरजेचे आहे. त्वचा संवेदनशील असल्याने कोणतेही उपाय करताना काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचे चेहऱ्यावर विपरीत परिणामही होऊ शकतात. एका तरुणीला चेहेऱ्यावर फेसमास्क लावणं चांगलच महागात पडलं आहे. टिकटॉक व्हिडीओ पाहून लावलेल्या फेसमास्कमुळे तिच्या चेहऱ्याचा रंगच बदलला आहे.

एक तरुणी नोकरीच्या मुलाखतसाठी तयारी करत होती. तिने एका फेसमास्कचा व्हिडीओ पाहिला आणि त्याप्रमाणे ते फेसमास्क चेहऱ्याला लावले. मुलाखतीत चेहरा चांगला दिसण्यासाठी तिने हा हिरव्या रंगाचा फेसमास्क लावला. त्यानंतर काहीवेळाने ती चेहरा धुवायला गेली. त्यावेळी आरशात चेहरा पाहून तिला धक्काच बसला. तिच्या चेहऱ्याचा रंग बदलला होता. तिचा चेहरा हिरव्या रंगाचा दिसू लागला होता. तिने तो रंग घालवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. अनेकांना फोन करुन रंग काढण्यासाठी विचारणा केली. मात्र, त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. कोणेतही उपाय करून तिच्या चेहऱ्याचा रंग गेलाच नाही.

या तरुणीचे टिकटॉकवर एक व्हिडीओ पाहिला होता. एका युजर्सने क्लोरोफिल फेसमास्कचा व्हिडीओ टाकला होता. तो व्हिडीओ पाहून तरुणीने हा प्रयोग केला. तिने अनेक प्रयत्न करुनही चेहऱ्याचा रंग गेला नाही. बॅंक ऑफ अमेरीकेत तिची नोकरीसाठी मुलाखत आहे, कोणाला हा रंग काढण्याबाबत काही उपाय माहित असल्यास सांगावे, असे आवाहन तिने सोशल मिडीयावर केले आहे. मात्र, यावरील कोणताही उपाय तिला अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे तिचा चिंता वाढली आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे चेहऱ्यावर कोणताही प्रयोग करण्यापूर्वी काळजी घ्यावी, असे तज्ज्ञांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या