#AyodhaVerdict – न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत! वाचा दिग्गजांच्या प्रतिक्रिया

6021

अनेक दशकांपासून सुरू असलेल्या अयोध्या प्रकरणाचा शनिवारी अंतिम निर्णय झाला. न्यायालयाने ती जागा प्रभू श्रीरामाची म्हणजेच रामलल्लाचीच असल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले. त्यानंतर आता अयोध्या प्रभू श्रीरामाचीच असून तेथेच भव्य मंदिर उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. अयोध्येतील ‘ती’ जागा हिंदूंची असून रामजन्मभूमीच्या जागेवरच मंदिर उभारावे, असे निर्णय न्यायालयाने दिला. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत देशभरातील जनतेने केले. वाचा या प्रकरणी कोणी काय प्रतिक्रिया दिली.

निर्णयाचे स्वागत
या अंतिम निर्णयाचा मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सन्मान करतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. मला आशा आहे की इतरही सर्व राजकीय पक्ष आणि धार्मिक संघटना या निर्णयाचा आदर करतील. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना समाजात बंधुभाव वाढीला लागावा यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत असे ते म्हणाले.

देशात हिंदुस्थानभक्तीची भावना
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या निर्णयाकडे कोणी वेगळ्या चष्म्यातून पाहील असे वाटत नाही. जवळपास सर्वांनीच या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुंबई तसेच महाराष्ट्रात अतिशय चांगले वातावरण पाहायला मिळत आहे त्याबद्दल मी जनतेचे आभार मानतो.

मंदिर वहीं बनेगा! अयोध्या प्रभू श्रीरामाचीच! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

शिवसेनाप्रमुख असायला हवे होते – राज ठाकरे
आता लवकरात लवकर राममंदिराची उभारणी व्हायला हवी आणि रामराज्यदेखील यायला हवे. हा निर्णय ऐकायला आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते. त्यांना खूप आनंद झाला असता अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या.

पाच एकरची भीक नको – ओवेसी
आम्ही आमच्या कायदेशीर अधिकारासाठी लढत होतो. त्यामुळे आम्हाला पाच एकरची भीक नको. त्यामुळे मुस्लिम पक्षकारांनी ही ऑफर नाकारावी. आपला देश हिंदू राष्ट्राच्या दिशेने जात आहे, असे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

#AyodhaVerdict 1528 ते 2019, वाचा ऐतिहासिक न्यायालयीन लढ्याचा घटनाक्रम

देशाची एकात्मता व बंधुत्वाचं परिपालन करणारा हा निर्णय आहे. या निकालाकडे कुणीही जय-पराजय म्हणून पाहू नये. उलट, भूतकाळात झालं गेलं सगळं विसरून आपण सर्वांनी एकत्र येऊन राममंदिर उभारणीसाठी प्रयत्न करायला हवा. देशकासीयांनी घटनेच्या मर्यादेत राहून आपला आनंद व्यक्त करावा, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

विविधतेत एकता ही हिंदुस्थानची ओळख असून आज पुन्हा एकदा त्याचं महत्त्व अधोरेखित झालं आहे. हे इतिहासातून पलटलेलं एखादं पान नाही, तर देशातील सव्वाशे कोटी जनतेनेच हा इतिहास आपणहून रचला आहे. न्यायालयाचा निकाल सर्वांनी स्वीकारला असून त्यातूनच लोकशाही जिवंत आहे आणि भक्कम आहे याचे दर्शन अवघ्या जगाला घडले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

#AyodhaVerdict वय 92 वर्षे, 40 वर्षांचा लढा!

हा क्षण माझ्यासाठी पूर्णत्काचा आहे. रामजन्मभूमी जनआंदोलनात मला माझे नम्र योगदान देण्याची संधी दिल्याबद्दल मी देकाचा आभारी आहे. हिंदुस्थानच्या स्वतंत्रता आंदोलनानंतरचे हे सर्कात मोठे आंदोलन होते. अयोध्याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे मनापासून स्वागत करणाऱ्या देशवासीयांच्या मी सोबत आहे, अशा भावना भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त केल्या.

अयोध्येतील रामजन्मभूमीच्या जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा देशातील जनतेने एकत्र येऊन सन्मान केला पाहिजे. तसेच आपण सर्वांनी मिळून आपल्यातील सद्भावना जपली पाहिजे. हा काळ सर्व देशवासीयांमध्ये बंधुत्व, विश्वास आणि प्रेम जपण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.

‘बाबरी’खाली मंदिराचे अवशेष शोधून काढले, के. के. मुहम्मद यांचे महत्त्वपूर्ण योगदान

आपली प्रतिक्रिया द्या