रस्त्यावर नमाज पढल्याने तो मुस्लिमांच्या मालकीचा होत नाही!

958

एखाद्या जागेवर केवळ नमाज अदा केली म्हणजे ती जागा मालकीची होत नाही. रस्त्यावर नमाज पढला म्हणजे तो रस्ता मुस्लिमांच्या मालकीचा होत नाही, असा सडेतोड युक्तिवाद आज रामलल्लाचे वकील सी. एस. वैद्यनाथन यांनी केला. आपल्या म्हणण्याच्या पुष्टीसाठी त्यांनी अयोध्येत वादग्रस्त जागेवर सापडलेल्या हिंदू मंदिराच्या अवशेषांची छायाचित्रेही सादर केली.

अयोध्या प्रकरणाची आज सातव्या दिवशीही सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या घटनापीठासमोर सुनावणी झाली. यावेळी रामलल्लाच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ विधिज्ञ सी. एस. वैद्यनाथन यांनी 16 एप्रिल 1950 मध्ये न्यायालयाच्या आदेशावरून आयुक्तांनी अयोध्येच्या वादग्रस्त जागेची पाहणी केली. आयुक्तांनी आपल्या अहवालात भगवान शंकराच्या शिल्पस्तंभाचा उल्लेख केला आहे. हिंदू देवदेवतांची शिल्पे मशिदीच्या स्तंभावर कशाला कोरण्यात येतील, असा सवाल त्यांनी केला. वैद्यनाथन यांनी वादग्रस्त जागेवरील छायाचित्रांचा अल्बम न्यायालयासमोर ठेवला. अशा प्रकारची छायाचित्रे मशिदीमध्ये नसतात, असे ते म्हणाले.

अयोध्या प्रकरण

वैद्यनाथन यांनी अयोध्येत सापडलेला एक नकाशाही न्यायालयाला सादर केला. या सर्व पुराव्यांवरून अयोध्या हे हिंदूंचे पवित्र तीर्थस्थान असल्याचे स्पष्ट होते, असा दावा त्यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या