राम मंदिर भूमीपूजन सोहळा, प्रियांका वाड्रा यांच्या ट्विटची चर्चा

1977
priyanka-gandhi

5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन होईल. या भूमीपूजनापूर्वी राजकीय विधानं देखील सातत्याने केली जात आहे. परंतु या सर्वांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. प्रियंका यांनी ट्विट करुन आपले निवेदन जारी केले आहे, त्या म्हणाल्या की, भूमीपूजनाचा कार्यक्रम राष्ट्रीय ऐक्य, बंधुत्व आणि सांस्कृतिक मेळाव्याचा एक प्रसंग बनावा.

प्रियंका गांधी वाड्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, ‘साधेपणा, धैर्य, संयम, त्याग, वचनबद्धता हे दीनबंधू राम नावाचे सार आहे. राम सर्वांमध्ये आहे, राम सर्वांबरोबर आहे. भगवान राम आणि माता सीतेच्या संदेशासह आणि रामललाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम राष्ट्रीय ऐक्य, बंधुत्व आणि सांस्कृतिक मंडळाचा एक प्रसंग असावा.

प्रियंका यांनी लिहिले आहे की 5 ऑगस्ट 2020 रोजी रामललाच्या मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. हा कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मतेचा क्षण व्हावा. जय सिया राम.

राम मंदिराबाबत कॉंग्रेसकडून वेगवेगळ्या प्रकारची विधाने येत असताना प्रियंका गांधी वाड्रा यांचे हे विधान समोर आले आहे. एकीकडे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भूमीपूजनाचे समर्थन केले आणि त्याचे स्वागतही केले. इतकेच नाही तर कमलनाथ यांनी आपल्या ट्विटरवरचा प्रोफाइल फोटोही बदलला असून ते भगव्या वस्त्रांमध्ये दिसत आहे.

तर दुसऱ्या बाजूला दिग्विजय सिंह यांनी भूमीपूजन कार्यक्रमासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या