#AYODHYAVERDICT सोशल मीडियावर पोलिसांची पाळत; धुळय़ात पहिली अटक

1476
social-media

अयोध्येतील रामजन्मभूमी- बाबरी मशीदप्रकरणी सर्वोच्च न्यायालय शनिवारी अंतिम निर्णय देणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सोशल मीडियावर पाळत ठेवली आहे. सोशल मीडियावरून यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार असून आज सायंकाळी धुळे येथे अशीच आक्षेपार्ह पोस्ट पसरवणाऱ्या एका 56 वर्षीय इसमाला पोलिसांनी अटक केली.

संजय रामेश्वर शर्मा असे या इसमाचे नाव असून तो धुळय़ाच्या जुन्या आग्रा रोड येथील रहिवासी आहे. ‘रामजन्मभूमीला न्याय मिळाला तर आपण दिवाळी साजरी करू. इतिहासाला लागलेला डाग मिटून जाईल.’ असे त्याने आपल्या फेसबुक वॉलवर प्रादेशिक भाषेमध्ये लिहिले होते. त्याप्रकरणी शर्मा याच्याविरुद्ध कलम 153(1)(बी) आणि 188 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या