#AyodhaVerdict वय 92 वर्षे, 40 वर्षांचा लढा!

8550

अनेक दशके चाललेल्या अयोध्या खटल्यात ज्येष्ठ वकील के. पारासरन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 92 वर्षांच्या पारासरन यांनी या खटल्यात मागील 40 वर्षांपासून हिंदू पक्षाची बाजू मांडली. माजी ऍटर्नी जनरल असलेल्या पारासरन यांना प्रभू श्रीरामाविषयी आध्यात्मिक ओढ होती. त्यामुळे त्यांनी हा खटला लढविण्याचे ठरविले. न्यायालयात बाजू मांडण्याआधी ते रोज सकाळी साडेदहा वाजल्यापासून संध्याकाळी उशिरापर्यंत या प्रकरणाचा अभ्यास करायचे. त्यांच्या मदतीला तरुण वकिलांची टीम कार्यरत होती. यात पी. व्ही. योगेश्वरन, अनिरुद्ध शर्मा, श्रीधर पोट्टाराजू, अदिती दानी, अश्विन कुमार डीएस आणि भक्तिवर्धन सिंह यांचा समावेश होता. 92 वर्षीय पारासरन यांची जिद्द आणि चिकाटी पाहून या तरुण वकिलांनाही हुरूप यायचा. अयोध्या खटल्याचा पारासरन यांचा अभ्यास इतका खोल आहे की ते खटल्यातील महत्त्वाच्या तारखा त्यांना आजही तोंडपाठ आहेत. या खटल्यात मुस्लिम पक्षाची बाजू मांडणाऱया ऍड. राजीव धवन हे अभेद्य युक्तिवादासाठी परिचित आहेत. मागील महिन्यात धवन यांनी न्यायालयाच्या परवानगीने हिंदू पक्षाची बाजू मांडणाऱया वक्तव्यांची कागदपत्रे फाडली तेव्हा पारसरन शांत होते.

आपली प्रतिक्रिया द्या