#AYODHYAVERDICT – जय श्रीराम! वादग्रस्त जागा रामलल्लाची

3776
 • आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो, पण या निकालाने आम्ही समाधानी नाही, सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील झयरब जिलानी यांनी अयोध्या निकालावर आपलं मत व्यक्त केलं.
 • #AYODHYAVERDICT-मुंबईत 144 कलम लागू
 • हा निर्णय ऐतिहासिक आहे. सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयासह विविधतेत एकता हा संदेश दिला आहे.
 • राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुपारी 12.30 मिनिटांनी पत्रकार परिषद, पत्रकार परिषदेनंतर वडाळ्याच्या राम मंदिरात ते दर्शनाला जाणार
 • गोपाल विशारद यांना पूजेचा अधिकार देण्यात आला
 • मंदिर निर्माणासाठी एका ट्रस्टचे गठन करण्याचे आदेेश

 • सुन्नी वक्फ बोर्डाचे सगळे दावे फेटाळून लावत सगळी वादग्रस्त जागा रामजन्मभूमी न्यासाला देण्याचा आदेश
 • सुन्नी वक्फ बोर्डाला 5 एकर जागा देण्याचा आदेश
 • वादग्रस्त जागेवर रामललाचा अधिकार सिद्ध झाला
 • वादग्रस्त जागेवर राम मंदिराचा मार्ग मोकळा
 • केंद्र सरकार यासाठी 3 महिन्यात एक योजना आखावी लागणार आहे
 • मशिदीसाठी मुसलमानांना पर्यायी जागा देण्यात यावी
 • वादग्रस्त जागेवरील बाह्य भागातील हिंदूंची पूजा,प्रार्थना करण्याची प्रथा अबाधित होती
 • वादग्रस्त जागा ही आपलीच आहे असा दावा सुन्नी वक्फ बोर्ड करू शकत नाही
 • बाहेरच्या भागामध्ये राम चबुतरा, सीता रसोई हे भाग येत असून तिथे हिंदू भाविक ब्रिटीश हिंदुस्थानात येण्यापूर्वीपासून पूजा करीत आहेत
 • न्यायालयाने आतला भाग आणि बाहेरचा भाग असे दोन हिस्से असून त्याआधारे निकालातील मुद्दे सांगायला सुरुवात केली
 • पुरातत्व विभागाच्या अहवालात 12 व्या शतकात इथे मंदीर होतं असं म्हटलं होतं
 • पुरातत्व विभागाच्या अहवालात मंदिर तोडून तिथे मशिद उभारल्याचे पुरावे नाहीयेत
 • जिथे वादग्रस्त जागा आहे तिुथे पूर्वी हिंदू पूजा करत होते-पुरातत्व विभागाचा अहवाल
 • हिंदुस्थानचा पुरातत्व विभाग हा एक्सपर्ट अथॉरिटी आहे-निकालात नमूद करण्यात आलेला युक्तिवाद

 • निर्मोही आखाड्याने ‘इथे सेवा करण्याचा अधिकार आमचा आहे’ यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली
 • आम्ही धर्मशास्त्रात जाण्यास इच्छुक नाही-निकालात नमूद करण्यात आलेला युक्तिवाद
 • ही मशिद ‘ मीर बाकी’  याने बांधली होती-निकालात नमूद करण्यात आलेला युक्तिवाद
 • 1949 मध्ये इथे दोन मुर्ती ठेवण्यात आल्या-निकालात नमूद करण्यात आलेला युक्तिवाद
 • निकाल वाचनास अर्धा तास लागणार-निकालात नमूद करण्यात आलेला युक्तिवाद

 • शिया बोर्डाने दाखल केलेली याचिका घटनापीठाने फेटाळली
 • घटनापीठाचे निकालाबाबत एकमत झाले
 • निकालावर सरन्यायाधीश आणि न्यायमूर्तींनी सही करण्यास सुरुवात केली
 • सरन्यायाधीशांनी बोलायाला सुरुवात झाली, रंजन गोगोई यांनी न्यायालयात सगळ्यांना शांत रहावे असे सांगितले
 • लिफाफाबंद निकालाची प्रत सरन्यायाधीश तसेच  न्यायमूर्तींच्या हातात पोहोचलीा
 • सरन्यायाधीशांसह न्यायमूर्ती निकाल वाचनासाठी न्यायालयात पोहोचले

 • न्यायालयाच्या 1 नंबर दालनात अधिक सुरक्षा मागवण्यात आली, निकालासाठी न्यायालयाच्य़ा परिसरात आणि दालनात अभतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात
 • सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्ट रूम नंबर 1 मध्ये निकालाचे वाचन होणार
 • हे पाच न्यायाधीश सुनावणार अयोध्येचा ऐतिहासिक निकाल
 • या खटल्याची सर्वोच्च न्यायालयाने सलग 40 दिवस सुनावणी केली होती, 16 ऑक्टोबरला न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता
 • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली
 • अयूब या सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लिखाण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत

 • उत्तर प्रदेश पोलिसांनी अमेठी पोलिसांतर्फे पत्रकार राणा अयूब या महिला पत्रकाराला प्रक्षोभक विधाने करू नयेत यासाठी सूचनावजा इशारा दिला आहे
 • सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या गाड्यांचा ताफा सर्वोच्च न्यायालयाकडे निघाला, इतर 4 न्यायमूर्ती न्यायालयात आधीच पोहोचले आहे
 • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील बैठकीला हजर

 • केंद्रीय गृहमंत्र्यांनी बैठक बोलावली, गृहसचिव बैठकीला उपस्थित
 • 10.30 मिनिटांनी सर्वोच्च न्यायालय निकाल देणार, निकालाचा गाभा (ऑपरेटीव्ह भाग) वाचून दाखवणार, संपूर्ण निकाल वेबसाईटवर वाचायला मिळणार

 • सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सगळ्यांनी मान्य करावा- नितीश कुमार, बिहारचे मुख्यमंत्री

 • पक्षकार आणि पक्षकारांच्या वकिलांनाच न्यायालयातील घटनापीठ ज्या दालनात बसणार आहे तिथे प्रवेश देण्यात येणार
 • श्री श्री रविशंकर यांनी रामजन्मभूमी प्रश्नी वाद सोडवण्यासाठी मध्यस्तता करण्याचा प्रयत्न केला होता
 • निकाल लागल्यानंतर जल्लोष करू नका-श्री श्री रविशंकर
 • सॉलिसिटर जनरल तुषार मेहता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले

 • रामजन्मभूमी, हनुमानगढी, शरयू नदीच्या काठावरील रामभक्तांना परिसरातून बाहेर जाण्यास सांगण्यात आले
 • राजस्थानमधील जयपूर पोलीस आयुक्तायल क्षेत्रामधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली
 • अयोध्येमध्ये निमलष्करी दल तैनात करण्यात आले
 • सरन्यायाधीश आणि घटनापीठातील न्यायमूर्तींची सुरक्षा वाढवण्यात आली
 • सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली

 • दुपारी 1 वाजता सरसंघचालक माध्यमांशी संवाद साधणार

 • सर्वोच्च न्यायालय ऐतिहासिक निकाल देणार
आपली प्रतिक्रिया द्या