नगरमधील आयुष रुग्णालय तीन वर्षांनंतरही अपूर्णच; निधी नसल्याने विद्युतीकरण व फर्निचरचे काम थांबले

खाटांचे आयुष रुग्णालय तीन वर्षांनंतरही अद्यापही अपूर्णच आहे. बांधकाम शेवटच्या टप्प्यात असून, निधी नसल्याने विद्युतीकरण व फर्निचरचे काम थांबले आहे. दरम्यान, जिल्हा नियोजनकडे सुमारे सव्वा कोटींची मागणी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पण प्रत्यक्षात निधी मिळाल्यानंतरच या कामाला गती मिळणार आहे.

केंद्र शासनाने राज्य वार्षिक कृती आराखडा 2017-18 अंतर्गत पुणे, नंदूरबार, सिंधुदुर्ग आणि नगर या चार ठिकाणी आयुष रुग्णालये उभारण्यास मंजुरी दिलेली होती. रुग्णालयाच्या बांधकामाकरिता 8.99 कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली. 2018-19 च्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्य दरसूचीनुसार 7 कोटी 31 लाख 63 हजार रुपयांची राष्ट्रीय आरोग्य अभियान अधीक्षक अभियंता व्ही. एल. कांबळे यांनी तांत्रिक मान्यता दिली. यासंदर्भात निविदा प्रक्रिया झाल्यानंतर लोणी येथील एका कंपनीला मिळाले. दि. 11 सप्टेंबर 2019 रोजी संबंधित ठेकेदार कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आला. यातील अटीनुसार कार्यारंभ आदेशापासून 12 महिन्यांत हे काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. तसेच हे काम पायाभूत सुविधा विकास कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषदेचे उपअभियंता यांच्या मार्गदर्शनात करण्याचे कळविले होते. प्रारंभी जागेचा वाद, त्यानंतर कोरोनामुळे कामास विलंब झाला. मुदत संपली तरी अजूनही हे काम अपूर्णच आहे.

अशी आहे रुग्णालयाची रचना

दुमजली बांधकाम – 33 हजार चौ.फू.

पहिला मजला – 19 हजार चौ.फू. पहिल्या मजल्यावर – केस पेपर, ओपीडी कक्ष, योग हॉल, पंचकर्म कक्ष .

दुसरा मजला – 17 हजार चौ.फू., दुसऱया मजल्यावर – शस्त्र्ाक्रिया विभाग, स्त्र्ााr-पुरुष स्वतंत्र वॉर्ड, स्पेशल रूम, लॅबोरेटरी, औषध विभाग, ऑफिस.

सध्या ‘आयुष’ व्हेंटिलेटरवर

– आयुषचे नवीन हॉस्पिटल लवकरच सुरू व्हावे, अशी अपेक्षा आहे. मात्र, सध्या पर्याय म्हणून सिव्हिलमध्ये 40 नंबरमध्ये आयुषची ओपीडी सुरू आहे. दररोज 100 पेक्षा अधिक रुग्णांवर डॉ. मिरीकर यांच्या मार्गदर्शनात पाच वैद्यकीय अधिकारी उपचार करतात. मात्र या ठिकाणी स्वच्छतागृह नाही, इतर सोयी-सुविधा नाही, त्यामुळे ‘आयुष’ व्हेंटिलेटरवर आहे.

26 जानेवारीचा मुहूर्त हुकला; आता…?

– या रुग्णालयात अल्पदरात रुग्णांना आयुर्वेदिक उपचार व औषधे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा या रुग्णालयाच्या उद्घाटनाकडे लागल्या आहेत. यापूर्वी 26 जानेवारी 2023 रोजी उद्घाटनाची चर्चा रंगली होती. मात्र, काम अपूर्ण असल्याने हा कार्यक्रम होऊ शकला नाही. त्यामुळे आता 2024 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी या रुग्णालयाचे लोकार्पण होईल का? याकडे लक्ष लागले आहे.

पैसे कमी पडले; पण मागणी केली का?

– फर्निचरसाठी 74 लाख 67 हजारांची, तर विद्युतीकरणासाठी सुमारे 45 लाखांची मागणी सिव्हिलकडून जिल्हाधिकारी सालीमठ यांच्यामार्फत पालकमंत्री विखे-पाटील यांच्याकडे करण्यात आल्याचे समजते. फक्त विद्युतीकरणासाठीच्या निधीची मागणी केल्याचे समजते. फर्निचरसाठी निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱयांच्यापर्यंत पोहोचलेलाच नसल्याचे समजले.