आयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधानला धक्का, काही देशांमध्ये घातली बंदी

1479

अभिनेता आयुष्मान खुरानाचा चित्रपट शुभ मंगल ज्यादा सावधान या चित्रपटाची सध्या जबरदस्त चर्चा सुरू आहे. या चित्रपटात आयुषमाान गे असलेल्या तरुणाची भूमिका साकारत आहे. आज हा चित्रपट रिलीज झाला मात्र रिलीजपूर्वीच या चित्रपटाला धक्का बसला आहे. या चित्रपटावर दुबई व युनायटेड अरब अमिरातीमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

शुभ मंगल ज्यादा सावधान या चित्रपटातून पहिल्यांदाच गे संबंध हिंदुस्थानात खुल्या मनाने दाखविण्यात येत आहेत. या चित्रपटात आयुष्मान व त्याचा गे पार्टनर जितेंद्र यांच्यात लिप किस करतानाचा देखील सिन आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या चित्रपटातून गे संबंधांचा प्रचार होतो त्यामुळे या चित्रपटावर बंदी घातली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी चित्रपटातून किसिंग सिन हटविण्याची देखील तयारी दाखवली होती. मात्र तरिही काही उपयोग झाला नाही. दुबई व युनायटेड अरब अमिरातीतील प्रशासनाने बंदी हटविण्यास नकार दिला.

आपली प्रतिक्रिया द्या