आता आयुष्मान खुराणा म्हणणार ढगाला लागली कळ!

738

सुपरस्टार दादा कोंडके यांच्या ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’ या सिनेमातील ‘ढगाला लागली कळ’ या गाण्याची जादू इतक्या वर्षानंतरही मराठी प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. आजही विविध कार्यक्रमांत हे गाणे आवर्जून लावले जाते. या लोकप्रिय गाण्याचा आता रिमेक येत असून यात अभिनेता आयुष्मान खुराणा थिरकणार आहे. ड्रीम गर्ल या चित्रपटातून हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून गणेशोत्सवाच्या काळात ते रिलीज होणार आहे. चित्रपटाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास या गाण्याची मोठी मदत होईल, असे मत दिग्दर्शक राज शांडील्य यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या