आज मी निशब्द झालो आहे, आयुषमान खुरानाने पोलिसांचे मराठीत मानले आभार

2744

देशभरात लॉकडाऊन जारी केल्यानंतर लोकांना घरात ठेवण्यासाठी पोलीस दिवसरात्र मेहनत घेत आहेत. या संकटाच्या काळात पोलीस लोकांना सर्वोतपरी मदत करत आहेत. त्यासाठी बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आयुषमान खुराना याने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहे. त्याने चक्क मराठीत ट्विट करून पोलिसांचे आभार मानले आहेत.

आयुष्मानने मुंबई पोलिसांचा एक व्हिडीओ रिट्विट करत तुमचे आभार मानन्यासाठी माझ्याकडे शब्दच नसल्याचे म्हटले आहे. ‘तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी मी निशब्द झालो आहे. परंतू मी आज तुम्हाला हृदयापासून धन्यवाद देत आहे. जय हिंद’, असे ट्विट करत आयुषमानने मुंबई पोलीस व महाराष्ट्र पोलिसांच आभार मानले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या