आझाद मैदानात घोंघावले लाल वादळ

किसान एकता झिंदाबाद….बीजेपी सरकार मुर्दाबाद….मोदी तेरी तानाशाही नही चलेगी….हमसे जो टकराऐगा मिट्टी मे मिल जायेगा… कल लडे थे गोरोंसे….आज लडेंगे चोरों से….इन्कलाब झिंदाबाद… लाल सलाम.. लाल सलाम… अशा बुलंद घोषणा आणि लाल झेंडय़ांचे वादळ आज दिवसभर आझाद मैदानात घोंगावत होते….

पृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी नवी दिल्लीच्या सीमेवर मागील साठ दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना  पाठिंबा देण्यासाठी कष्टकरी शेतकऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन पुकारले आहे.  राज्याच्या वेगवेगळय़ा  भागातून आलेले शेतकरी पेंद्र सरकारच्या विरोधात एकवटले आहेत. त्यामुळे पेंद्र सरकारच्या विरोधात दिवसभर घोषणा सुरू होत्या. हातातील कामे बाजूला ठेवून हजारो शेतकऱ्यांनी मुंबईकडे पूच केले. काही वयोवृद्ध शेतकरी, महिला, लहान मुले आणि कुटुंबकबिला घेऊन आझाद मैदानात पायी आले आहेत. लाल झेंडे, लाल टोप्या आणि लाल उपरणे गळय़ात घालून शेतकऱ्यांचे जथेच्या जथे आझाद मैदानात येऊन थडकत होते. शेतकऱ्यांची संख्या वाढताना पेंद्र सरकारच्या विरोधातील घोषणाही वाढत होत्या.

अन्नदात्यासाठी लंगर

शनिवारी गावातून निघताना शेतकऱ्यांनी थोडाफार शिधा-जेवण सोबत घेतले होते; पण मुंबईत आल्यावर विविध स्वयंसेवी संस्थांनी अन्नदात्याची पोटापाण्याची व्यवस्था केली आहे. दादर पूर्व येथील श्री गुरुसिंग सभा या संस्थेने शेतकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. दादर येथील गुरुद्वारामध्ये तीनशे-चारशे सेवेकऱ्यांनी या बळीराजासाठी जेवणाचे डबे तयार केले. आज दिवसभरात 25 हजारांपेक्षा अधिक अन्न पाकिटांचे वाटप करण्यात आले. तर खालसा एड या स्वयंसेवी संस्थेने शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. दिवसभरात पंधरा हजारांपेक्षा अधिक पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केल्याचे इक्बाल सिंग म्हणाले. स्वयंसेवी सस्थांच्या जोडीने महापालिकेने पिण्याच्या पाण्याची मोबाईल टॉयलेटची सोय केली होती. डाँक्टरांचे पथकही तैनात केले आहे.

दिल्लीप्रमाणे मुंबईत एकवटले

नवी दिल्लीच्या सीमेवर मागील साठ दिवसांपासून शेतकऱ्यांनी अतिशय शांततामय मार्गाने आंदोलन पुकारले आहे. त्याच धर्तीवर मुंबईत आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. आज लाँग मार्चनंतर उद्या 26 जानेवारीलाही शेतकरी आझाद मैदानात ठिय्या पुकारतील. दमून भागून आलेल्या या शेतकऱ्यांसाठी आझाद मैदानात शाहिरी जलसे, आरोग्य शिबीर, केळी, पुरकरे, बिस्किट, चहा-नाश्ता याची सोय केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या