… तेव्हा खेळाडूंनी विष घेण्याचा विचार केलेला, गोलंदाजी प्रशिक्षकांचा गौप्यस्फोट

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत हिंदुस्थानकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानी संघावर टीकेचा भडीमार केला होता. प्रसारमाध्यमांच्या नकारात्मकतेमुळे आणि नकारात्मक प्रश्नांमुळे खेळाडूंवरील दबाब वाढलेला व त्यांच्या मनात विष खाऊन जीव देण्याचा विचार येत होता, असा गौप्यस्फोट पाकिस्तानचे गोलंदाजी प्रशिक्षक अझहर महमूद यांनी केला आहे. याआधी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी हिंदुस्थानविरुद्धच्या पराभवानंतर आत्महत्या करण्याचा विचार केला होता, असे खळबळजनक खुलासा केला होता.

अझहर महमूद म्हणाले, प्रसारमाध्यमांच्या नकारात्मकतेमुळे एखादा व्यक्ती आत्महत्येचाही विचार करतो. मिकी आर्थर यांच्या वक्तव्याला समर्थन देताना ते म्हणाले की प्रसारमाध्यमांनी सकारात्मक गोष्टी दाखवायला हव्यात. सकारात्मकता दाखवली तर जगण्याचा आशा वाढतात. परंतु आमच्याकडे एखादा सामना हरला तर असे दाखवतात की जसे संपूर्ण जग नष्ट झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या