सुल्तान अझलन शहा हॉकी स्पर्धा; हिंदुस्थान सलामीलाच जपानला भिडणार!

29

सामना ऑनलाईन । इपोह

गेल्या मोसमातील अपयशाला मागे सारून हिंदुस्थानचा हॉकी संघ सुल्तान अझलन शहा हॉकी स्पर्धेत सलामीलाच जपानला भिडणार आहे. 23 ते 30 मार्च या कालावधीत खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत सहा संघ जेतेपदासाठी झुंजणार आहेत. ऑस्ट्रेलियाने ही स्पर्धा सर्वाधिक दहा वेळा जिंकण्याची करामत करून दाखवलीय. हिंदुस्थानला पाच वेळा या स्पर्धेत चॅम्पियन होता आले आहे. हिंदुस्थानी संघ विनाप्रशिक्षक खेळत असून बहुतांशी खेळाडूंना दुखापतींनी ग्रासले आहे. त्यानंतरही मनप्रीत सिंगच्या नेतृत्वात हॉकीच्या रणांगणात उतरणारा हिंदुस्थानी संघ आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेला आहे.

नऊ वर्षांनंतर

हिंदुस्थानच्या हॉकी संघाने 1985, 1991, 1995, 2009 व 2010 साली ही स्पर्धा जिंकलीय. त्यानंतर मात्र नऊ वर्षे त्यांना या स्पर्धेत चॅम्पियन होता आले नाही. यंदा हा संघ अजिंक्यपदावर नाव कोरण्यासाठी जिवाचे रान करताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.

हिंदुस्थानच्या लढती खालीलप्रमाणे

  • 23 मार्च – जपान
  • 24 मार्च – द. कोरिया
  • 26 मार्च – मलेशिया
  • 27 मार्च – कॅनडा
  • 29 मार्च – पोलंड
आपली प्रतिक्रिया द्या