६००० मुलींना नकार देणाऱ्या बाहुबलीला कोण आवडते माहीत आहे ?

बाहुबलीच्या यशानंतर बाहुबली फेम प्रभासने एका चित्रपटासाठी २० कोटींची मागणी केल्यामुळे करण जोहरने त्याला आपल्या चित्रपटात घेतले नाही.

सामना ऑनलाईन । मुंबई

बाहुबली सिनेमाच्या यशानंतर बाहुबली म्हणजे अभिनेता प्रभास देशभरातील तरूणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्यामुळे प्रत्येकीलाच प्रभासच्या वैयक्तिक जीवना विषयीची माहिती जाणून घ्यायची इच्छा आहे. बाहुबलीच्या प्रदर्शनानंतर अनेक मुलींनी प्रभासवर अक्षरश: जीव ओवाळून टाकला. पण प्रभासला मात्र एक अभिनेत्री आवडते. ती अभिनेत्री जर तुम्हाला अनुष्का शेट्टी आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा समज चुकीचा आहे. कारण त्याला आवडते बॉलिवूडची ‘मस्तानी’ स्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण.

Image result for deepika

प्रभासने स्वत: दीपिका पदुकोण आपल्याला खुप आवडत असल्याचं कबुल केलं आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यानं हा खुलासा केला आहे. तसेच दीपिका आपली सिक्रेट क्रश असल्याचंही त्यानं सांगितलं आहे. दीपिकसोबत एकतरी सिनेमा करण्याची इच्छा त्यानं व्यक्त केली आहे. प्रभासने बाहुबली सिनेमाच्या शुटिंगदरम्यान लग्नासाठी आलेल्या जवळपास ६००० मुलींच्या प्रस्तावांना नकार दिला होता.

आपली प्रतिक्रिया द्या