बाहुबली हेल्मेट घालतो तर तुम्ही का लाजता?

सामना प्रतिनिधी । पुणे

पुणेकरांचा हेल्मेट सक्तीला कडाडून विरोध आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी पुणे पोलिसांनी चक्क बाहुबलीचा आधार घेतला. ‘जर बाहुबली हेल्मेट घालतो तर आपण का लाजतो?’ असा सवाल करत हेल्मेट वापरा सुरक्षीत रहा असे आवाहन ट्विटरवरून केले आहे.

इतर शहरांमध्ये हेल्मेट सक्तीला विरोध नसतो, पण पुण्यामध्ये राजकीय पक्ष आणि नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतात त्यामुळे पोलिसांना शांत बसावे लागते. पोलिसांनी हेल्मेट सक्ती करण्यापेक्षा त्यांनी याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी असा युक्तीवाद पुणेकर करतात. केस गळणे, मान दुखने, बाहेरचे ऐकु न येणे या समस्यांमुळे हेल्मेट सक्तीला पुणेकरांचा विरोध असल्याने हे मुद्देही कायम चर्चेत असतात.

पुणे पोलिसांनी शुक्रवारी ‘पुणे सिटी पोलीस’ या अधिकृत ट्विटर हँडलवरून हेल्मेट वापराबाबत भाष्य केले. त्यामध्ये ‘एखाद्या शिरस्त्राणाने बाहुबलीच्या डोक्यावर युद्ध वाचवल्यास ते नक्कीच रस्त्यावर आपले रक्षण करू शकेल, क्ष्जयमाहेश्मती क्ष्जयपुणे’ असे ट्विट केले आहे तर त्यासोबत बाहुबलीचा फोटा वापरून त्यात ‘जर बाहुबली हेल्मेट वापरतो तर आपण का लाजतो?’ हेल्मेट वापरा, सुरक्षीत रहा’ असा संदेश दिला आहे. पुणेकरांनी त्यांना लाईक, रिट्विट आणि प्रतिक्रया देत प्रतिसाद दिला.

आपली प्रतिक्रिया द्या